ई-फेरफार प्रणाली क्लाऊडवर स्थांनांतरीत करणेचे पुर्वतयारी बाबत मार्गदर्शक सुचना क्र.९९
मार्गदर्शक सूचना क्रमांक - 99
प्रति,
उपजिल्हाधिकारी तथा डीडीई (सर्व)
विषय :- ई-फेरफार प्रणाली
क्लाऊडवर स्थांनांतरीत करणेचे पुर्वतयारी बाबत.
आपणास हे ज्ञात आहे की, शासन धोरणाप्रमाणे ई-फेरफार प्रणालीचे पुर्ण कामकाज माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत उच्चाधिकार समितीने निश्चित करुन दिलेल्या ESDS Software Solution Pvt. Ltd. या GCC
Cloud कंपनीचे डाटासेंटरमध्ये लवकरच
स्थानांतरीत करणेत येणार आहे. त्यासाठी आपल्या जिल्हयाची खालीलप्रमाणे पुर्वतयारी होणे आवश्यक आहे.
1. क्लाऊडवर स्थानांतरीत करण्यापूर्वी आपल्या जिल्हयातील तलाठी, मंडळ अधिकारी यांचेसह सर्व वापरकर्ते यांचे अचूक ईमेल आयडी व अचूक
मोबाईल नंबर युझर क्रियेशन मधुन प्रणालीमध्ये नोंदविणे आवश्यक आहे व त्यात नमुद सर्व
ईमेल आयडी
व मोबाईल
नंबर अचूक
नसल्यास वापरकर्त्यांना
क्लाऊडवर कामकाज
करता येणार
नाही.
2. क्ला़ऊडवर स्थानांतरीत करण्यापूर्वी आपल्या जिल्हयातील सर्व गावांचे घोषणापत्र-३ सह
प्रख्यापन आदेश काढणे आवश्यक आहे. तसेच फेज-२ चे
कामकाज पुर्ण होणे गरजेचे आहे.
3. साधारणत: दिनांक 20/02/2019 पासून प्रणालीचे क्लाऊडवर स्थानांतरण सुरु करणेत येणार आहे. त्यापूर्वी मंडळ अधिकारी स्तरावर प्रलंबित असलेले फेरफार निर्गती अथवा पिकपाहणी अद्यावत करणेचे कामकाज पुर्ण करुन घ्यावे. स्थानांतर कालावधीमध्ये
काही दिवस
ई-फेरफार प्रणालीतील
कामकाज बंद
राहणार असल्याने
त्यापुर्वी तातडीचे
काम पुर्ण
करुन घ्यावे.
4. ज्या तालुक्यातील 1-2 गांवे घोषणापत्र करणेची शिल्लक आहेत व आता
काम पुर्ण झाले आहे त्या ठिकाणी घोषणापत्र-३ करुन
तालुका फेज- २ साठी
पात्र करण्यात यावा.
तरी वरीलप्रमाणे
कामकाज दिनांक
20/02/2019 पर्यंत
पुर्ण करावे.
सदरच्या सुचना सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, डीबीए यांचेसह
तहसिलदार यांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती.
( रामदास जगताप )
राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त
कार्यालय (म.राज्य) पुणे.
प्रत-
1.
उप आयुक्त (महसूल) विभागीय आयुक्त
कार्यालय (सर्व)
2.
उपविभागीय अधिकारी (सर्व)
3.
तहसिलदार (सर्व)
Comments