रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

दि १५.२.२०१९ पासून बारामती , दिंडोरी , वाडा, फुलंब्री , अचलपूर व कामठी तालुक्यात ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी सुरु


 मार्गदर्शक सूचना क्र. ९८                                                           रा.भू.अ.आ.का.4/रा../८   /2019
                                                                                                 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख,
                                         ( हाराष्ट्र राज्य ) पुणे यांचे कार्यालय, पुणे
                                         दिनांक:- १४ /02/2019.
प्रति,
उपजिल्हाधिकारी तथा डी.डी..
पुणे , नाशिक , पालघर , औरंगाबाद , अमरावती व नागपूर 
    
                  विषय :- ई पीक पाहणी  या भ्रमणध्वनी ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पिकपाहणीच्या नोंदी गाव नमुना १२ मध्ये घेण्यासाठी                                    ची माहिती तलाठ्याकडे पाठवण्याची  सुविधा  दि .१५.२.२०१९  पासून सुरु करणे बाबत .

  संदर्भ:- १. महसूल व वन विभाग , शासन निर्णय क्र. जमीन-२०१८ /प्र.क्र.९२ /ज -१ अ  दि. १०.०९.२०१८
             २. कृषी आयुक्तालय पुणे येथील दिनांक 2 फेब्रुवारी 2019 ची ई-पिकपाहणी बाबतची  राज्यस्तरीय कार्यशाळा.

             उपरोक्त संदर्भीय विषयान्वये संदर्भ १ च्या शासन निर्णयान्वये  -पिक पाहणी या मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पिकपाहणीच्या नोंदी गाव नमुना १२ मध्ये घेण्यासाठी  ची माहिती तलाठ्याकडे पाठवण्याची  सुविधा  टाटा ट्रस्ट च्या मदतीने विकसित केली असून या बाबतच्या कृषी आयुक्तालय, पुणे येथे दिनांक 02/02/2019 रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत दिलेल्या सूचनांप्रमाणे खाली नमूद केलेल्या प्रत्येक महसूल विभागातील एका तालुक्यात हा पथदर्शी प्रकल्प दि १५.२.२०१९ पासून कार्यान्वित करणेत येत आहे .
.क्र.
विभाग
जिल्हा
तालुका
1.
नाशिक
नाशिक
दिंडोरी
2.
नागपूर
नागपूर
कामठी
3.
अमरावती
अमरावती
अचलपूर
4.
औरंगाबाद
औरंगाबाद
फुलंब्री
5.
पुणे
पुणे
बारामती
6.
कोकण
पालघर
वाडा
             या तालुक्यातील सर्व  तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, प्रत्येक गावातुन किमान ३ ते ५  शेतकरी यांना  दिलेल्या तालुका स्थरावरील प्रशिक्षणानंतर प्रत्येक गावात शेतकरी यांचेसाठी गावनिहाय प्रशिक्षण कार्यशाळा  पूर्ण झाल्या  असतील  अशी अपेक्षा आहे .
           उपरोक्त नमूद तालुक्यातील सर्व महसुली गावातील सर्व शेतकऱ्यांसाठी  नोंदणीची प्रक्रिया उद्या पासून पूर्ण करून रब्बी हंगाम व संपूर्ण वर्ष  या  हंगामासाठी शेतात उभ्या असलेल्या पिकांची पीक पाहणी ची माहिती  पिकांच्या फोटोसह या मोबाईल ॲपद्वारे येत्या १० दिवसात  अपलोड करावी . टेस्टिंग करताना काही शेतकरी यांनी नोंदणी केली असली तरी सर्व शेतकऱ्यांच्यासोबत  या शेतकऱ्यांनी देखील  या  कामासाठी  मोबाईल ॲपवर  पुन्हा नोंदणी करणे आवश्यक आहे .  सदरचे काम मोहीम स्वरुपात करून घेण्याची जबाबदारी महसूल ,कृषी व ग्राम विकास विभागाच्या संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांची राहील .
                सदरच्या सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणाव्यात ही विनंती.
                      आपला विश्वासू,
                  ( रामदास जगताप )
              राज्य समन्वयक, -फेरफार प्रकल्प
                जमाबंदी आयुक्त कार्यालय (.राज्य) पुणे.

Comments

Archive

Contact Form

Send