ई फेरफार प्रणाली मध्ये काम करताना पडणारे काही प्रश्न त्याची उत्तरे -
नमस्कार मित्रांनो ,
ई फेरफार प्रणाली मध्ये काम करताना पडणारे काही प्रश्न त्याची उत्तरे -
१. पूर्वावलोकन पाहताना माहिती बरोबर आहे / बरोबर नाही हे TAB ओपन नाही ? –
उत्तर -आत्ता तलाठी यांनी पूर्वावलोकन पाहणे बंधनकारक आहे त्यामुळे खाली असलेल्या यादीतील ७/१२ निवडून पुर्वावलोकन पाहावे नंतर परत पुर्वावलोकन बरोबरची खाञी करा असे येते त्या वेळी परत पुर्वावलोकन वर क्लीक करून शेरा भरून लगेचच माहीती बरोबर आहे ही टॅब ओपन दिसते तेथे क्लीक केल्यास नोंद साठवली जातेय.
२. कलम १५५ च्या दुरुस्ती सुविधा मध्ये काही ७/१२ ओपन होत नाहीत ?
उत्तर – कलम १५५ च्या दुरुस्ती सुविधा देखील सध्या एका ७/१२ साठी एकदाच वापता येते ( ONE TIME) त्यामुळे एक दुरुस्ती केल्या नंतर दुसऱ्या दुरुस्ती साठी तो ७/१२ उपलब्ध होत नाही .
३. फेज १ नंतर काही ७/१२ वरील पिक पेरे उडाले आहेत ?
उत्तर – फेज १ च्या कामा मध्ये आंपण जुना नमुना ७ व १२ चा अनावश्यक डेटा ( सन २००२ पासून २०१६ पर्यंत कंस झालेल्या नोंदी व सन २००२ ते २०१६ पर्यंतची पिक पाहणी चा ) वेगळा केलां अआहे त्यामुळे जर चालू ७/१२ वर सन २०१५-१६ पासून पुढच्या वर्षाची पिक पाहणी केली नसल्यास नमुना १२ वर पिके दिसणार नाहीत .
४. योग्य रित्या अंमल झाला नाही हे फेरफार कसे निर्गत करावेत ?
उत्तर – ई फेरफार प्रणालीत फेरफार मंडळ अधिकारी यांनी मंजूर / प्रमाणित केल्या नंतर ७/१२ अंमल योग्य झाला किंवा योग्यरीत्या अंमल झाला नाही या पैकी एक योग्य शेरा द्यावा लागतो तथापि योग्यरीत्या अंमल झाला नसलेल्या अनेक फेरफारच योग्य आमाल करण्यासठी च्या सर्व दुरुस्त्या सध्या करता येत नाहीत म्हणून त्यावर असे सर्व फेरफार क.१५५ च्या आदेशाने दुरुस्ती सुविधे मध्ये दुरुस्त्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला असून त्याप्रमाणे सुविधा लवकरच देनेत येईल .
५. फेज १ च्या कामा नंतर क.१५५ च्या आदेशाने घेतलेले फेरफार मंजूर करताना एरर येतो.?
उत्तर – फेज 1 च्या कामामध्ये एक डेटा टेबल शिफ्ट झाल्याने ही अडचण झाली होती ती सध्या आज पासून दूर करणेत आली आहे . आत्ता असा एरर येणार नाही .
६. फेज १ च्या कामा नंतर एडीट / री एडीट चे फेरफार दिसत नाहीत ?
उत्तर – फेज १ च्या कामामध्ये एडीट व री एडीट चे सर्व डेटा वेगळा केला असल्याने ते सध्या दिसत नाहीत तथापि त्याची सुविधा लवकरच देणेत येत आहे .
७. फेज १ चे काम कशासाठी केले ? त्याचा काय फायदा होईल ?
उत्तर – फेज १ मध्ये सर्व अनावश्यक जुना डेटा वेगळा करणेत येत आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा DATABASE SIZE ५०% ने कमी होणार आहे त्या मुले ई फेरफार ची गती वाढण्यास मदत होईल .
८. फेज १ चे काम पूर्ण झाले का ?
उत्तर – राज्यातील ३३ ONLINE जिल्ह्यांपैकी सातारा या एकाच ONLINE जिल्ह्याचे फेज १ चे काम शिल्लक आहे ( रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे लोकल सर्वर वर आहेत ) १६ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे १००% फेज १ चे काम झाले असून १६ जिल्ह्यांचे ४२ तालुके ( डी ३ न झाल्याने ) प्रलंबित आहेत उर्वरीत २८८ तालुक्यांचे फेज १ चे काम पूर्ण झाले आहे .
हे आपल्या माहिती साठी .
७/१२ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
आपला
रामदास जगताप
दि ७/१२ /२०१८
Comments