ई हक्क प्रणाली (PDE Module )चे Testing करून UAT रिपोर्ट पाठविणे बाबत dt 5.11.2018
क्र./रा.भू.अ.आ.का.4/रा.स. / ७५ /2018.
जमाबंदी आयुक्त आणि संचालक,
भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे.
दिनांक:- ०५ /1१/2018.
प्रति,
रजा राखीव उपजिल्हाधिकारी
तथा डी डी ई ,
जिल्हाधिकारी कार्यालय , पुणे
विषय :- ई हक्क प्रणाली (PDE Module )चे Testing करून UAT रिपोर्ट पाठविणे बाबत
संदर्भ :- आपले कडील दूरध्वनी संदेश दि ५.११.२०१८
ई फेरफार प्रणाली मध्ये घेनेत येणाऱ्या फेरफारासाठी तलाठी कार्यालयात खातेदार यांचे कडून दाखल करण्यात येणारे अर्ज ONLINE पद्धतीने दाखल करण्यासाठी तसेच तलाठी कार्यालयात हस्त पोहोच प्राप्त जाहलेले अर्ज देखील ई फेरफार प्रणालीत फेरफार घेण्यासाठीचे PUBLIC DATA ENTRY MODULE ( PDE) ई हक्क प्रणाली नावाने NIC, पुणे यांचे मार्फत विकसित करणेचे काम सुरु आहे या आज पर्यंत विकसित झालेल्या प्रणालीचे टेस्टिंग मुळशी तालुक्यातील सर्व तलाठी / मंडळ अधिकारी व खातेदारांकडून करून घेणेचे आहे .
या टेस्टिंग साठी https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin.aspx ही लिंक वापरावी . या साठी मुळशी तालुक्यातील सर्व तलाठी , मंडळ अधिकारी यांना आपले ई फेरफार चे लॉगीन आय डी व PASSWORD वापरून काम करता येईल .
खातेदारांसाठी / पब्लिक साठी Login : testuser1 व password : abcdA09@
वापरून अर्ज भरता येईल .
१. वारस’,
२. बोजा घेणे /गहाणखत,
३. बोजा कमी करणे,
४. अपाक शेरा कमी करणे,
५. एकुम्या कमी करणे
६. मयताचे नाव कमी करणे
७. ई करार
८. विश्वास्थांचे नाव बदलणे - या फेरफार प्रकारासाठी अर्जदार / खातेदार , तलाठी व मंडळ अधिकारी स्थरावरील टेस्टिंग करून आपल्या सूचना , अडचणी , सुधारणा बाबत आपला UAT अहवाल तातडीने पाठवावा हि विनंती .
या मध्ये PDE MODULE चे कामा नंतर ई फेरफार मध्ये PDE DASHBOARD मध्ये फेरफार घेण्याची व त्यानंतर फेरफार मंजुरीची प्रक्रिया मंडळ अधिकारी लॉगीन ने करून पहावी .
सदरचा कामकाज हे TEST DATABASE वर होणार असल्याने त्याचा कोणताही परिणाम खऱ्या/ चालू ७/१२ वर होणार नाही हे सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणावे हि विनंती .
आपला विश्वासू
( रामदास जगताप )
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
ई फेरफार प्रकल्प , महाराष्ट्र राज्य
पुणे
प्रत - उप विभागीय अधिकारी ,मावळ
प्रत – तहसीलदार, मुळशी
कृपया सदरचे सर्व अर्ज प्रकारासाठी चे टेस्टिंग आपण स्वता देखील करून पाहावे व सूचना अडचणी व सुधारणा लेखी कळवाव्यात .
खात्यातील दुरुस्त्या करताना स न search करून दुरुस्त्या कराव्या लागतात खाता search करून दुरुस्त्या करायची सुविधा दिली असती तर आणखी गुणवत्ता पूर्ण जॅम झाले असते
ReplyDelete