कोल्हापूर , पुणे , रायगड , औरंगाबाद , लातूर , सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना महत्वाची सूचना UAT तपासणी साठी महत्वाच्या सूचना दि २७.७.२०१८
नमस्कार मित्रांनो .
कोल्हापूर , पुणे , रायगड , औरंगाबाद , लातूर , सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना महत्वाची सूचना
१. या जिल्ह्यांना eferfar2beta_test_newsatbara ची साईट पुनः चालू करून दिली आहे , त्यांनी ही साईट फक्त नवीन ७/१२ तयार करणेसाठी वापरावी
२. कलम १५५ च्या आदेशाने अहवाल १ ची दुरुस्ती , कलम १५५ च्या आदेशाने ईतर हक्कातील प्रकार व उपप्रकार बदले आणी कलम १५५ च्या आदेशाने हस्तलिखित मधील न भरलेले ७/१२ भरणे या सुविधा UAT साठी दिल्या आहेत .
३. कलम १५५ च्या आदेशाने होणाऱ्या सर्व फेरफार प्रकारासाठी तहसीलदार यांचे मान्यतेचे परीशिष्ट क ( क १५५ चा आदेश ) समाविष्ट करणेत आला आहे .
४. बिनशेती चे ७/१२ व क्षेत्र दुरुस्तीच्या फेरफार व नवीन ७/१२ तयार करताना ७/१२ च्या ईतर हक्कातील दुरुस्ती करता येईल
५. बोजा कमी करताना सामान्य फेरफार प्रकारामध्ये येणारा Invalid input syntax error आत्ता येणार नाही
या सुधारणा कोल्हापूर , पुणे , रायगड , औरंगाबाद , लातूर , सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनी वापरून पाहून uat चा feedback द्यावा
आपला
रामदास जगताप
दि २७.७.२०१८
Comments