रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई-फेरफार प्रणालीमध्ये सात नवीन सुविधा बाबत वापरकर्ता चाचणी अहवाल (UAT) सादर करणे बाबत

नमस्कार मित्रांनो , क्र.रा.भू.अ.आ.का.4/UAT/ 57 /2018 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय, पुणे दिनांक २0/0७ /२०१८ प्रति , उपजिल्हाधिकारी तथा डि. डि. ई. पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, वर्धा, नाशिक, औरंगाबाद, जालना, लातूर आणि उस्मानाबाद विषय :- ई-फेरफार प्रणालीमध्ये सात नवीन सुविधा बाबत वापरकर्ता चाचणी अहवाल (UAT) सादर करणे बाबत ..... महोदय, ई-फेरफार प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे प्रणालीत सुधारणा करुन सात नवीन सुविधा आपल्या जिल्हयासाठी उपलब्ध करून देणेत येत आहेत. १. इतर अधिकारातील नोंदीचे प्रकार व उपप्रकार बदलणे २. ई-फेरफार मधील मंजूर झालेल्या फेरफारचा तपशील व मंडळ अधिकार्‍याचा शेरा बदलणे : ३. ई-फेरफार मधील खाता एकत्रीकरण. ४. राजपत्राने नावात बदल (Template). ५. खरेदी (अविभाज्य हिस्सा संपूर्ण / अंशतः विक्री) ६. 155 च्या आदेशाने अहवाल 1 ची दुरूस्ती. ७. फेरफार योग्यरित्या प्रमाणित झाला नाही याबाबत करावयाची कार्यवाही या सात नविन सुविधांचे User Manual ही सोबत पाठवित आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करणे बाबत निवडक तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व तहसीलदार यांनी काळजीपूर्वक वापरून (वापरकर्ता चाचणी अहवाल UAT REPORT) द्यावा ही विनंती . आपला विश्वासू ( रामदास जगताप ) उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख (म. रा.) पुणे यांचे करिता

Comments

Archive

Contact Form

Send