रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

दुय्यम निबंधक यांचे कडून येणारे चुकीचे सूची २ च्या माहितीत दुरुस्ती करून फेरफार घेणे बाबत दि.१७.०६.२०१८

नमस्कार मित्रांनो , दुय्यम निबंधक (SRO) यांचे कडून दस्त नोंदणी करताना खालील प्रमाणे त्रुटी राहतात असे लक्षात आले आहे त्यामुळे असे फेरफार प्रमाणित करताना अनेक अडचणी येतात किंवा अश्या फेरफारांचा योग्य अंमल होत नाही त्यासाठी तलाठी स्थरावर अश्या तपशीलात सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याबाबतचे USER MANUAL सर्वांना WHATS APP तसेच मेल वर उपलब्ध करून दिले आहे त्या प्रमाणे कार्यवाही करावी १. सामाईक खात्यात क्षेत्र निश्चित केले नसताना दस्तऐवजा मध्ये क्षेत्र निश्चित करून एकच सह हिस्सेदार विक्री करतो त्यास SRO कडून SKN1 व उर्वरीत क्षेत्र उर्वरीत सह हिस्सेदारांपैकी एकाच्या नावासमोर SKN2 नमूद करून टाकले जाते . अश्या वेळी तलाठ्याला आपले क्षेत्र न विकणारा ग्रुप चा SKN2 हा ग्रुप नष्ट करून नोटीस काढता येईल व फेरफार वर पुढील करता येईल २. सामाईक खात्यात क्षेत्र निश्चित केले नसताना दस्तऐवजा मध्ये क्षेत्र निश्चित करून एकच सह हिस्सेदार त्याचे हिस्स्याचे क्षेत्र विक्री करतो त्यास SRO कडून त्याला ग्रुप करून SKN1 असे नमूद केले जात नाही . अश्या वेळी तलाठी स्थरावर SKN TKN दुरुस्ती पर्यायातून फेरफार दुरुस्ती मधून SKN1 असा ग्रुप तयार करून फेरफारची नोटीस काढता येईल व फेरफार वर पुढील करता येईल ३. सामाईक खात्यात क्षेत्र निश्चित केले नसताना अश्या खात्यातील एकच सह हिस्सेदार संपूर्ण विक्री करतो अश्या दस्तामध्ये सह हिस्सेदाराचा उल्लेख केला जात नाही . अश्या वेळी तलाठी स्थरावर RE-ENTRY- फेरफार दुरुस्ती पर्यायातून दास्ताप्रमाणे उर्वरित सर्व सह हिस्सेदारांची नावे समाविष्ट करून फेरफारची नोटीस काढता येईल व फेरफार वर पुढील करता येईल ४. खरेदीदार एकटाच असताना खरेदीदाराचे खाते म्हणून त्याचे सामाईक खाते दर्शविले जाते मात्र खरेदीदार म्हणून एकाच व्यक्ती असते अश्यावेळी SRO कडून TKN नंबर दिला जात नाही . अश्या वेळी तलाठी स्थरावर नवीन खाते तयार करून नोटीस काढता येईल अथवा खरेदीदार म्हणून अन्य सह हिस्सेदाराची नावे तलाठ्याला गरजे प्रमाणे सामाविष्ट करता येतील. असे चार पर्यायातून दुरुस्त्या करूनच फेरफार मंजूर करता येईल , हे जरी जरा किचकट वाटत असले तरी युजर MANUAL पाहून काळजीपूर्वक दुरुस्त्या करूनच कामकाज करावे . आपला रामदास जगताप दि १७.०६.२०१८

Comments

Archive

Contact Form

Send