डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ तयार करणे व खातेदार यांना उपलब्ध करून देणे बाबत -सुविधा बंद असले बाबत
नमस्कार मित्रांनो ,
दि. २८.५.२०१८ सायंकाळ पासून ई फेरफार प्रणाली च्या मास्टर सर्वर मध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडानंतर सांगली , सोलापूर व गोंदिया वगळता अन्य जिल्ह्यातील ई फेरफार
प्रणालीचे कामकाज पूर्ववत सुरु झाले आहे मात्र डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ करणे ( DSP) च्या कामामुळे (PDF STORAGE) आणि जनतेची या वेबसाईट वर झुंबड उडाल्याने सर्वर वर अतिरिक्त ताण पडल्याने ई फेरफार सह ७/१२ व ८ अ वितरणाची सर्वच प्रक्रिया बाधित झाली होती. सध्या अनेक शेतकरी यांना खरीप पिक कर्ज मंजूर करून घेण्यासाठी ७/१२ व ८ अ ची उपलब्धता व ई करार / बोजाच्या फेरफार नोंदी करून सुधारीत ७/१२ उपलब्ध करून देणे ही प्राथमिकता असल्याने वरील सर्वच जिल्ह्यामध्ये ( ठाणे , नाशिक, कोल्हापूर , सातारा व चंद्रपूर वगळून ) DSP करणे व जनतेला उपलब्ध करून देणे बंद ठेवण्यात आले आहे .BSNL CLOUD वरील जिल्ह्याच्या सर्वर चे कामकाज पाहून त्याबाबत देखील निर्णय घेनेत येईल . सर्वर क्षमता वाढविल्या नंतर अथवा GCC ( GOVERNMENT COMMUNITY CLOUD) वर सर्व जिल्हे स्थानांतरीत केलेनंतरच DSP चे काम सुरु करता येईल असे दिसते . तथापि ते लवकरात लवकर सुरु करणे चा प्रयत्न चालू आहे . सध्या तोपर्यंत जनतेला ७/१२ ., ८ अ व फेरफार उपलब्ध करून देणे तसेच सर्व ODC अहवाल निरंक करणे , कलम १५५ / २५७ चे आदेश पारित करून ७/१२ दुरुस्त करणे ईत्यादी कामे प्राधान्याने करावीत असे वाटते .
आपला
रामदास जगताप
दि. १२.६.२०१८
Comments