रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ODC मध्ये शून्य फेरफार क्रमांक बदलणे व खाता नं. बदलणे ची सुविधा

नमस्कार मित्रांनो , आपली अडचण विचारात घेऊन ODC मधील अतिरिक्त अहवाल ५ ची व अहवाल ८ च्या दुरुस्ती साठी नवीन सुविधा आज पासून उपलब्ध करून देनेत येत आहे . १) ODC मधील अतिरिक्त अहवाल ५ ची दुरुस्ती साठी तीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत अ) पर्याय १ खात्यात नवे समाविष्ट करून व वगळून दुरुस्ती - दुरुस्ती सुविधा क्र २१ ब) पर्याय २ खाता विभागणी करून दुरुस्ती - दुरुस्ती सुविधा क्र २२ क) पर्याय ३ खाता क्रमांक बदलून दुरुस्ती - दुरुस्ती सुविधा क्र २३ असे तीन पर्याय असून अ) पर्याय १- खात्यात नवे समाविष्ट करून व वगळून दुरुस्ती ( दुरुस्ती सुविधा क्र २१) -- हा पर्याय जर एकाच नाव वेगवेगळ्या सर्वे नं वर वेगवेगळ्या पद्धतीने लिहिली असेल तर अशी वेगवेगळ्या सर्वे नं वरील नावे प्रथम समाविष्ट करून जे नाव योग्य पद्धतीने लिहिले असेल ते ठेऊन अयोग्य पद्धतीने लिहिलेले नाव निवडून वगळण्यात यावे . ब) पर्याय २ खाता विभागणी करून दुरुस्ती ( दुरुस्ती सुविधा क्र २२)-- हा पर्याय जर काही सर्वे नं वरील अतिरिक्त नावाचे वेगळे खाते करायचे असल्यास वापरावा ( या पर्यायाचा वापर जास्त होणार नाही ) क) पर्याय ३ खाता क्रमांक बदलून दुरुस्ती ( दुरुस्ती सुविधा क्र २३) -- हा पर्याय जर एकाच खात्यातील काही सर्वे नं वरील नावे व नावांची संख्या वेगवेगळी असताना खाते तयार झाले असल्यास ( किंवा घोषणापत्र १ पूर्वी खाता विभागणी करायचे राहिले असल्यास ) व आत्ता आपणास ती नावे व नावांची संख्या तीच कायम ठेवायची असल्यास खाता विभागणी करून खाते क्रमांक बदलण्यासाठी वापरावा . याचे युजर म्यानुअल सोबत जोडले आहे २) ODC मधील शून्य फेरफार क्रमांकाची दुरुस्ती (अहवाल ८ ची दुरुस्ती ) दुरुस्ती सुविधा क्र.२४ उपलब्ध करून दिली आहे , या मध्ये फक्त फेरफार क्रमांक शून्य असलेल्या खातेदाराच्या नावासमोरील फेरफार क्रमांक बदलता येईल . तो फेरफार क्रमांक योग्य असल्याची खात्री तलाठी यांनी स्वता करावी कारण या फेरफार क्रमांकाची नक्कल आपल्याला देता आली पाहिजे . याचे युजर म्यानुअल सोबत जोडले आहे या नव्याने दिलेल्या सुविधांचा योग्य वापर करून ODC अहवाल ८ व अतिरिक्त अहवाल ५ दुरुस्त करूनच सातबारा डिजिटल स्वाक्षरीत करावेत ही सुविधा आज सायंकाळ पासून सर्व जिल्ह्यांना उपलब्ध होईल आपला रामदास जगताप दि.२५.५.२०१८

Comments

Archive

Contact Form

Send