MONITOR SERVER दिनांक २८.५.२०१८ पासून बंद असले बाबत
नमस्कार मित्रांनो,
सोमवार दि. २८.५.२०१८ रोजी साय.६.०० वाजल्या पासून SDC वरील MONITOR SERVER ( ज्यावरून सर्व UC चे काम काज चालते )
मध्ये तांत्रिक बिघाड झाल्या मुळे व अन्य काही सेर्वर वर स्पेस कमी असल्याने राज्यातील २९ जिल्ह्यातील कामकाज ठप्प झाले आहे .
या मुळे आपल्या सर्वच तलाठी , मंडळ अधिकारी , सर्व महसूल अधिकारी यांना जनतेच्या प्रक्षोभाला सामोरे जावे लागत आहे याची पूर्ण जाणीव आहे .
सदरचे काम तातडीने पूर्ववत करण्याचे काम SDC व माहिती तंत्रज्ञान संचालनालय स्थरावर सुरु आहे . त्यात अद्याप पूर्णता यश आलेले नसलेतरी .
SDC ने एक पर्यायी MONITOR SERVER उपलब्ध करून दिला आहे . तो वापरून ई फेरफार ची सेवा थोड्याच वेळात सुरु होईल अशी अपेक्षा आहे .
मात्र आज फक्त जनतेला ७/१२ , फेरफार व ८ अ उपलब्ध करून देण्यासाठी या सेवेचा वापर करावा .
लवकरच फेरफार घेणे व मंजूर करणे साठी ही सेवा वापरता येईल मात्र DSP चे काम काज सध्या बंदच ठेवाणेत येईल .
तांत्रिक अडचणी मुळे खातेदारांना व तलाठी मंडळ अधिकारी यांना झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व .
आपला
रामदास जगताप
Comments