आपल्या विनती व सुचानाप्रमाणे ई फेरफार प्रणाली मध्ये आज दि १९.२.२०१९ पासून खालील प्रमाणे नवीन सुविधा उपलब्ध करून देणेत येत आहेत .
१. प्रत्येक फेरफार प्रकारासाठी गरजेप्रमाणे चेक लिस्ट बदल करून देणेत आली आहे .
२. कलम १५५ च्या आदेशाने नवीन ७/१२ तयार केल्यानंतर मंजूर करताना "Can not find Table 0 issue" हा एरर आता येणार नाही .
३. कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्तीच्या सुविधा एका ७/१२ साठी एकदाच वापरता येत होती ती आता ही दुरुस्ती सुविधा अनेक वेळा वापरता येईल .
४. " खातेदारांची माहिती " या ई फेरफार मधील अहवालामध्ये सामाईक / संयुक्त खात्यातील प्रत्येक खातेदाराचे नाव स्वतंत्र row मध्ये दाखविणारा व त्याचे नावासमोर खात्यावरील एकूण क्षेत्र दाखविणारा खातेदारांची माहिती ( सुधारित ) हा एक अहवाल उपलब्ध करून दिला आहे ( गरज असेल तरच हा अहवाल PMKISAN साठी वापरावा ) ( डी डी ई सांगली यांची विनंती ) .
५.५००० पेक्षा जास्त खाती असलेल्या गावात खातेदारांची माहिती हा अहवाल वेगळ्या पद्धतीने तयार होऊन थेट download मध्ये उपलब्ध होणार ( डी डी ई कोल्हापूर यांची विनंती ) .
६ फेज २ झालेल्या जिल्ह्यात फेरफार रजिस्टर मध्ये नोटीस बजावलेली तारीख दिसत नव्हती ती आता व्यवस्थित दिसेल अशी सुधारणा करणेत आली आहे .
७. भूधारणा निवडताना " कुळकायदा कलम ३२ ग ने मिळालेल्या जमिनी " हा प्रकार निवडता तेथे आदिवशी खातेदारांच्या जमिनी असा पर्याय दिसत असल्याची कोकण विभागाने निदर्शनास आणलेली अडचण दूर करणेत आली आहे .
८. नक्कल फी च्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणी साठी - दस्तावेज वितरण प्रणाली -(Document Distribution Module ) पुणे व रायगड जिल्ह्यांसाठी UAT साठी उपलब्ध करून दिले आहे .(DDM) : URL ishttps://IP/ddm
९. रत्नागिरी जिल्हा , सिंधुदुर्ग जिल्हा व नाशिक शहर तालुका यांना कलम १५५ च्या आदेशाने मान्यता देण्यासाठी तहसीलदार यांन लॉगीन साठी User Creation अद्यावत करून देणेत आले आहे . १०.चूक दुरुस्ती सुविधे मधील डेटा सैनिंग साठी येणार अनावश्यक मेसेज आता येणार नाही . ११. फेज २ पूर्ण झालेल्या जिल्ह्यात DSP MODULE मध्ये नमुना १२ मधील पिक पाहणी दिसत नव्हती ती दुरुस्त करून दाखवणेत आली आहे त्यामुळे फेज २ झालेल्या जिल्ह्यात देखील DSP काम करता येईल .
१२. जालना जिल्ह्याचे फेज २ चे काम आज पूर्ण करणेत आले . १३. आज राज्यातील सर्व जिल्ह्यात तीन त्रुटी मध्ये असलेले ( अहवाल १ मधील १ आर पेक्षा क्षेत्राची तफावत असलेले ७/१२ , क्षेत्र व एकक चुकलेले ७/१२ आणी २० हे आर पेक्षा जास्त क्षेत्राचे शेतीचे ७/१२ तसेच ९९ आर पेक्षा जास्त क्षेत्राचे ७/१२ ची जिल्हा निहाय यादी उपलब्ध करून दिली आहे त्या प्रमाणे चुकीचे ७/१२ कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्त्यांच्या सुविधांमधून युद्ध पातळीवर दुरुस्त करणेत यावेत .
सदरच्या नवीन सुविधा सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती
Best command
ReplyDelete