रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

वडाचीवाडी नगर रचना योजना मंजुरीसाठी शासनाकडे सादर

 

वडाचीवाडी नगर रचना योजना मंजुरीसाठी शासनाकडे सादर

                           पुणे महानगर प्रदेश विकास प्रधीकरणाच्या वतीने वडाचीवाडी ता हवेली येथील १३४.७९ हेक्टर क्षेत्रावरील प्रस्तावित प्राथमिक  योजना मजुरीसाठी शासनाकडे सादर केली आहे. पीएमआरडीए क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासाठी नगर रचना योजनाचे नियोजन केले असून पीएमआरडीए च्या अंतर्गत वर्तुळाकार मार्गाचे ( रिंग रोड ) क्षेत्र संपादनासाठी प्रस्तावित केलेल्या अनेक योजना पैकी वडाचीवाडी नगर रचना योजनेतील सर्व जमीन मालक यांना वैयक्तिक सुनावणी दिल्या नंतर या योजनेसाठी शासननियुक्त लवाद श्री रवींद्र जायभाये या सहाय्यक संचालक नगर रचना दर्जाच्या अधिकाऱ्याने  लवाद विषयक कामकाज पूर्ण करून ही योजना मंजुरीसाठी शासनाकडे नुकतीच सादर केली आहे.

                           सुमारे १७०० खातेदार शेतकरी यांची १३१.८४ हेक्टर क्षेत्र व २.९५ हेक्टर नाल्याचे क्षेत्राचा या नगर रचना योजनेत समावेश असून त्यामध्ये ५०%  क्षेत्राचे  १४८  विकसित अंतिम  भूखंड लाभधारक शेतकरी यांना उपलब्ध करून देनेत आले असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या (EWS) गृह योजनासाठी ११.७२ हेक्टर क्षेत्राचे ९ भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत. या योजना क्षेत्रात सुमारे १९.२२ % क्षेत्र (२५.३३ हे.आर.) रिंगरोड (९.८३ हे.) व अंतर्गत रस्ते(१५.५० हे.), मैदानांसाठी ७ भूखंड, बगीचा साठी ११ भूखंड, बालोद्यानासाठी ८ भूखंड, ग्रीन बेल्ट साठी २ भूखंड व २ खुल्या जागा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत, या शिवाय नागरी सुविधांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय, सांस्कृतिक केंद्र, भाजीपाला केंद्र, अग्निशामक केंद्र, स्मशानभूमी, सब स्टेशन, सांडपाणी प्रक्रीया केंद्र, बस स्थानक, शॉपिंग सेंटर, या साठी देखील भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत. या नगर रचना योजनेतून ६५ मी  रुंदीच्या  १.५ कि मी रस्तासाठी लागणारे सुमारे ९.८३ हे.आर क्षेत्र ताब्यात येईल. सदरची योजनेचे ल्वादीय कामकाज पूर्ण झाल्याची घोषणा लवाद यांनी दि २६ जाने ते १ फेब्रु २०२३ च्या शासन राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.






टिप्पण्या

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा