रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

सात बारा ची नक्कल देण्यापूर्वी खाता दुरुस्ती , चूक दुरुस्ती फेरफार दरम्यान झालेल्या फेरफाराचा अंमल पाहून दुरुस्त किंवा खात्री करणे

खाता दुरुस्ती , चूक दुरुस्ती फेरफार दरम्यान झालेल्या फेरफाराची दुरुस्त किंवा खात्री करणे 

                                        प्रस्तावना  : सुरवातीच्या काळामध्ये जेव्हा खाता दुरुस्ती फेरफार चूक दुरुस्ती फेरफार हा प्रथम वेळेस सर्वांना देण्यात आला होता त्यावेळेस सदर दुरुस्ती पूर्ण झाल्याशिवाय म्हणजेच तो फेरफार प्रमाणित झाल्याशिवाय इतर कोणताही फेरफार नोंदवणे अपेक्षित नव्हते परंतु काही गावांमध्ये असे करता खाता दुरुस्ती फेरफार अथवा चूक दुरुस्ती फेरफार अपूर्ण ठेऊन दुसरे फेरफार नोंदवले गेले  असे फेरफार प्रमाणित पण केले गेले. तदनंतर सुरवातीस घेतलेला खाता दुरुस्ती फेरफार अथवा चूक दुरुस्ती फेरफार हा तहसीलदार यांच्या मान्यतेने नोंदऊन मंडळ अधिकारी यांच्या द्वारे प्रमाणित झाला त्यामुळे खाता दुरुस्ती फेरफार अथवा चूक दुरुस्ती फेरफार नोंदऊन मंडळ अधिकारी यांच्या द्वारे प्रमाणित करण्याच्या कालावधी मध्ये जे अन्य फेरफार प्रमाणित झाले होते त्यांचे नोंदी (फक्त असे फेरफार ज्या मध्ये त्याच नावां  संबंधी दुरुस्त्या दोन्ही फेरफारां मध्ये घेण्यात आल्या  ) दिसेनास्या झाल्या खाता दुरुस्ती फेरफार अथवा चूक दुरुस्ती फेरफार नोंद प्रमाणित झाल्याची नोंद /१२ वर दिसू लागली.

                                  हि बाब जेव्हा आपल्या निदर्शनास आली तेव्हा -फेरफार प्रणाली मधे खाता दुरुस्ती फेरफार अथवा चूक दुरुस्ती फेरफार नोंदऊन मंडळ अधिकारी यांच्या द्वारे प्रमाणित होई पर्यंत दुसरा कोणताही फेरफार प्रमाणित होऊ देण्यासाठी उपाय योजना केली गेली.परंतु दरम्यानच्या काळा मधे असे जे फेरफार प्रमाणित झाले तदनंतर ज्यांचे नोंदी दिसेनास्या झालेल्या अशा सर्वे क्रमांकावर त्या नोंदी पुनः प्रस्थापित करण्यासाठी खाता दुरुस्ती  / चूक दुरुस्ती फेरफार घेऊन सदर नोंदी पूर्ववत करता येतील.  याचा निर्णय /१२  फेरफार रजिस्टर पाहून घ्यावा लागेल. या मध्ये फक्त अशाच नोंदींना समस्या आल्या ज्या  मध्ये  खाता अथवा चूक दुरुस्ती चे फेरफारामध्ये ज्या नावांची दुरुस्ती प्रमाणित ना करता  त्याच नावं संबंधी फेरफार पुढील फेरफारामध्ये  घेण्यात आले.

                 इतर नावं  चे फेरफारांना कोणताही प्रॉब्लेम आला नाही. त्यामुळे अशा नोंदींचे  सर्व्हे क्रमांक संभाव्य त्रुटी  म्हणून दाखवण्यात येत आहेत. आपणास   /१२  उचित आहे  हे बघण्याची सोय निर्णय (/१२  कन्फर्म करणे अथवा चूक दुरुस्ती वा खाता दुरुस्ती फेरफार घेऊन सदर त्रुटी दूर करणे) घेणे साठी  ची सोय खाली नमूद वेब  साईट वर दिली  आहे 

अशा वेळेस खाता दुरुस्ती फेरफार अथवा चूक दुरुस्ती फेरफार जो इतर फेरफारानंतर प्रमाणित केला त्या मुळे  ( त्या खाता / नावा  संबंधी)   नष्ट झालेल्या   नोंद पुन्हा चूक दुरुस्ती / खाता दुरुस्ती ने घेणे किंवा कसे याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. दुरुस्ती फेरफार घेण्यासाठी खाली नमूद साईट वापरावी

 या साठीचे मार्गदर्शिका सोबत जोडली आहे. 

वेब साईट लिंक :  https://mahaferfarnas.enlightcloud.com/cdkdcm/  

 


टिप्पण्या

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा