रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

महिना निहाय चलन तयार करण्याची सुविधा

 महिना निहाय चलन तयार करण्याची सुविधा 

नमस्कार मित्रांनो.

अभिलेख वितरण प्रणालीतील (डीडीएम)  वितरित अभिलेखांची नक्कल फी शासन जमा करण्यासाठी मार्च 2020 पासून बँक ऑफ बडोदा चा VAN नंबर द्वारे केली जात आहे. जर एका महिन्याची नक्कल फी जमा केली नसेल तर सदारची रक्कम पुढील महिन्याच्या चालना मध्ये समाविष्ट केली जात होती परंतु त्यामध्ये येणार्‍या अडचणी विचारात घेवून दिनांक. 12.10.2020 पासून महिना निहाय चलन तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे तरी प्रत्येक तलाठी यांनी महिना निहाय चलन तयार करून ज्या महिन्याचे चलन यापूर्वी भरले नाही ह्याची खात्री करूनच  त्या महिन्याचे चलना प्रमाणे ऑनलाइन किंवा बँकेत रोख रक्कम जमा करावी. कोणत्याही तालुक्यातील सर्व साझे यांची संपूर्ण रक्कम जमा झाल्या शिवाय तलाठी सझा व महसूल मंडळ पुनर्रचना आदेशा प्रमाणे साझा फोड किंवा नवीन साझा निर्मिती करता येणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

रामदास जगताप

राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प

दिनांक 14.10.2020

टिप्पण्या

  1. मा सर, बँकेत भरणा केलेल्या रक्कम व शिल्लक रक्कम याचा MIS उपलब्ध करून दिल्यास,सोयीस्कर होईल

    उत्तर द्याहटवा
  2. मा.सर,
    ज्या ठिकाणी बँक शाखा उपलब्ध नाही किंवा ज्यांच्याकडे नेट बँकिंग सुद्धा नाही अशा तलाठी मंडळीना DDM चलान भरणा पेमेंट गेट वे सुविधेद्वारे किंवा GRASS प्रणालीद्वारे भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास चलान भरण्यास सर्वांसाठी सोयीचे होईल सर धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  3. मा सर ज्या प्रमाणे महाभूमी मधून ऑनलाइन फीस भरून 7/12 काढता येतो, त्या प्रमाणे तलाठी लॉगिन मधून प्रीपेड स्वरूपात 5 रु भरणा करून 7/12 निघाल्यास, सोयीचे होईल।

    उत्तर द्याहटवा
  4. नमस्ते सर ,वाशीम जील्यातून कारंजा तालुका ,सर तलाठी यांनी बँकेत ddm चा भरणा केल्याचा mis उपलब्ध करून द्यावा जेणे करून राहिलेले तलाठी यांचा आढावा घेणे सोपे जाईल ,हि विनंती असावी

    उत्तर द्याहटवा

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा